Ad will apear here
Next
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव
सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित करताना मान्यवर

पुणे : ‘शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे मत नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइ) वतीने आणि नगरसेविका सुनिता वाडेकर व रिपाइचे नेते परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी दीपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आनंद छाजेड, रिपाइचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, जिल्हा युवक आघाडीचे उमेश कांबळे, प्रविण ओव्हाळ, वसंत जूनवणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी पुणे महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिरोळे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

आमदारपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ शिरोळे यांचा सत्कार करताना मान्यवर

परशुराम वाडेकर म्हणाले, ‘सफाई कर्मचाऱ्यांच्या भावना, व्यथांची जाण असल्याने त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे वाटत असल्याने गेल्या काही वर्षांपासून हा सत्कार सोहळा व दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद होतो. त्यांच्या अडीअडचणी समजतात आणि त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो.’

प्रकाश ढोरे म्हणाले, ‘समाजात काम करताना विविध घटकांशी आपला संबंध येतो. समाज आपली दखल घेत असतो. आपणही त्यांची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे. आपण न थांबता काम सुरू ठेवले पाहिजे.’ 

सुनीता वाडेकर म्हणाल्या, ‘आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या पाल्यांकडेही आमचे लक्ष असते. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत असतो;तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो.’

प्रभागातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय ढोणे यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZECG
Similar Posts
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव पुणे : आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला
...आणि ‘त्यांच्या’ही डोळ्यांत उजळली दिवाळी! पुणे : सुंदरसा पाट, रांगोळ्यांचा थाट, सुगंधी तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचे ताट, नव्या कपड्यांचा साज आणि गोडाचा घास यामुळे ‘त्यांच्या’ डोळ्यांत दिवाळीच्या लाख लाख दीपांचे तेज झळकत होते. चेहरे आनंदाने फुलबाज्यांसारखे खुलले होते.. हे दृश्य होते नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या अनोख्या दिवाळीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language